सानिया-शोएब मलिकला पुत्ररत्न

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. आज सकाळी सानिया मिर्झाने मुलाला जन्म दिला आहे.

2010 मध्ये सानिया आणि शोएब विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. शोएब मलिकने ट्विटरवर सानिया आई झाल्याची गोड बातमी दिली

शोएबने आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटर अकाऊंटवर ही घोषणा केली.

त्याने लिहीले की,”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मला मुलगा झाला आणि सानिया सुखरुप असून ती नेहमीप्रमाणे खंबीर आहे आम्हाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार.” 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *