स्मारकासाठी 2 हजार कोटींचा खर्च, वल्लभभाईंना तरी हे कसे पटेल? – राज ठाकरे

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरील खर्चावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

स्मारकावरील खर्च 2 हजार 290 कोटी रुपये इतका असून हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला असून हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. या पुतळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावरुन राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाजपाला फटकारलं आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचे अनावरण 31 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंती दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी आपल्या भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *