‘वडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला’- नारायण राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा आज मुंबई कार्यकर्ता मेळावा मुंबईतल्या वांद्रे इथल्या रंगशारदा येथे होत आहे. या मेळाव्यात आज मुंबईतील पदे वाटप केली जाणार आहेत.

उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील देवस्थानं माहिती नाहीत आणि ते अयोध्येत राममंदिर बांधायला निघाले आहेत अशी सडकून टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.

नारायण राणे- 

  • शिवसेना फक्त मातोश्रीसाठी
  • विठोबा ,महालक्ष्मी, शिर्डीला कधी गेले नाही 
  • आता चालले आयोध्याला चालले राम मंदिर बांधायला 
  • वडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला
  • महापौर बंगल्याची जागा द्या म्हणतो 
  • अरे तू स्वतःच्या पैशाने बांधू शकत नाही का साहेबांनी जे पैसे जमवून ठेवले ते पैसे वापरू शकत नाही का?
  • हे मुंबईच्या झोपड्या कमी करू शकले नाही, नाले स्वच्छ करू शकले नाही ही मुंबई 25 वर्ष सत्ता असून हे मुंबई स्वच्छ करू शकले नाहीत. अयोध्येत जातात तर कायमचे जा आणि जाताना भगवे कपडे देखील घालून जा तिकडे हिमालय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *