वडिलांना हौदात सापडल्या आपल्या चिमुकल्या ‘या’ अवस्थेत

वाद आणि तणाव वाढला की त्याचे रुपांतर रागात होते. रागाला मर्यादा नाही, आपला राग आपल्याला कोणतेही कृत्य करण्यास भाग पाडू शकते. याचेच एक उदाहरण सांगणारे धक्कादायक कृत्य बीडमध्ये उघड झाले आहे.
दीपाली आमटे आणि राधेश्याम आमटे हे बीडमधल्या नरसोबानगर भागात राहतात. सोमवारी घरातील सर्व लोक बाहेर गेले होते. तर राधेश्याम रिक्षा घेवून बाहेर गेला होता. राधेश्याम रात्री घरी आल्यावर त्याला पत्नी व मुली दिसल्या नाहीत. त्याने सर्वत्र पत्नी व मुलींचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेच सापडल्या नाहीत. त्यामुळे राधेश्यामने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि घरी आला. मंगळवारी आंघोळीसाठी हौदातून पाणी काढत असताना राधेश्यामला मुलींचे मृतदेह दिसले. त्याने याबाबतची माहिती तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.
काय घडलं नेमकं?
दीपाली आमटे आणि राधेश्याम आमटे यांच्यात नेहमी चारित्र्य संशयावरून वाद व्हायचे. राधेश्याम हे नेहमी दीपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण करायचा, याचाच राग दीपालीच्या डोक्यात दिवसेंदिवस वाढत गेला.  
राधेश्याम रात्री घरी आल्यावर त्याला पत्नी व मुली दिसल्या नाहीत. त्याने सर्वत्र पत्नी व मुलींचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेच सापडल्या नाहीत. त्यामुळे राधेश्यामने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि घरी आला. मंगळवारी आंघोळीसाठी हौदातून पाणी काढत असताना राधेश्यामला मुलींचे मृतदेह दिसले. राधेश्याम आमटे यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी थेट दीपालीला तिच्या माहेरी गाठले.
‘पतीने मला मारहाण करुन मुलींना हौदात टाकले’ असा बनाव तिने माहेरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मात्र, पोलीसांनी याबाबत खोलपर्यंत तपास केल्यानंतर या घटनेचं रहस्य उघड झालं.
दुपारच्या वेळेस घरी कोणीच नसल्याने दीपालीने आपल्या दोन्ही मुलींना घरातील पाण्याच्या मोठ्या हौदात टाकून दिले. त्यानंतर ती गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथे माहेरी निघून गेली.
पती चारित्र्यावर संशय घेत सतत भांडण करतो, म्हणून रागातून दीपालीने हा प्रकार केला. तिन्ही मुली असल्यामुळे दीपालीने दोन मुलींना मारले असेल का? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. राधेश्याम आमटे याच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. 
अवघ्या 23 वर्षाच्या निर्दयी आईने हे कृत्य केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  
राधेश्याम व दीपाली यांना तीन मुली आहेत. त्यापैकी गायत्री (वय ३) आणि छोट्या ४ महिन्याच्या मुलीला दीपालीने ठार केले. मोठी मुलगी गौरी ही ५ वर्षाची आहे. गौरी दोन दिवसापूर्वीच आत्याकडे गेल्यामुळे ती या घटनेत वाचली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *