वर्ल्ड कप दौऱ्यात सोबत हवी पत्नी; खेळाडूंची BCCI कडे मागणी

पुढच्य़ा वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे. सरावासोबत भारतीय खेळाडूंनी आपल्या मागण्यांची यादी प्रशासकीय समितीकडे दिली आहे. या यादीत चक्क खेळाडूंनी त्यांची पत्नी सोबत असावी यासह अनेक मागण्या केल्या आहेत.  

2019चा विश्वचषक हा भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. खेळाडूंचे त्यानूसार सरावही सुरू आहे. सरावासोबत खेळाडूंनी इंग्लंडला होणाऱ्या विश्वचषकासाठी खास मागण्य़ा केल्या आहेत. यामध्ये खेळाडूंकडून केळींची मागणी करण्य़ात आली आहे. त्याचं झालं असं की, गेल्या महिन्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्य़ात भारतीय संघाचे पसंतीची फळं न पुरवल्याने भारतीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्य़ात बीसीसीआयच्या स्वखर्चाने खेळाडूंना केळी उपलब्ध करावीत.

त्याचबरोबर हॉटेलचे बुकिंग करताना अद्ययावत जिम असावी तसंच किती वेळ हॉटेलमध्ये राहावे लागणार आहे, याची माहिती आणि पत्नी सोबत असताना शिष्टाचाराविषयीची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, वेळ वाचावा यासाठी यासठी ट्रेनने प्रवास करुन द्यावा अशीही मागणी खेळाडूंनी केली आहे. बीसीसीआय खेळाडूंच्या भल्याचा विचार करुन निर्णय घेणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *