नक्षली हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस कर्मचारी शहीद

छत्तीसगडमधल्या दंतेवाडा परिसरातल्या आरनपूर येथे नक्षलवाद्यांनी हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे.

नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दूरदर्शनचा कॅमेरामन आणि दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून ठार झालेले कॅमेरामन अच्युतानंद साहू हे दूरदर्शनच्या दिल्ली कार्यालयात काम करत होते.

या हल्ल्यात एक सब इन्स्पेक्टर रूद्र प्रताप आणि आरक्षक मंगलूही शहीद झाल्याची माहीती समोर येत आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दूरदर्शनची टीम फसली असताना ही दूर्घटना घडली.

दूरदर्शनची टीम ही या भागात दिल्लीमधून रमन सरकारची विकास गाथा शूट करण्यासाठी गेली होती, त्यांची टीम त्या परिसरातून परतत असताना  झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक हल्ला चढवला.

त्यावेळी नक्षलींच्या हल्ल्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *