टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, या 2 बदलामुळे जिंकणार का भारत?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तिसरा सामन्यात हार पत्करावी लागल्यानंतर मालिकेत आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. गेल्या तीन सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक ठोकले आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची धूरा ही कोहलीच्या खांद्यावर असणार आहे.  

तीसरा सामना हारल्यानंतर सुरु असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. नवख्या रिषभ पंतला बाहेर करुन त्याच्या जागी केदार जाधवला संधी देण्यात आली आहे. तर यजुवेंद्र चहलच्या जागी अनुभवी रवींद्र जडेजा संघात परतला आहे.

केदार जाधवला दुखापत झाल्यामुळे मागील काही सामने खेळू शकला नव्हता पण आता त्याला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलं आहे.

रिषभ पंतला या मालिकेत मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. म्हणूनच त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. आता केदार जाधव मिळालेल्या संधीचं सोनं करतो की नाही हे पाहाणं उत्सुकाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *