…आणि कुत्र्याने वाचवला 5 जणांचा जीव

कुत्रा हा इमानदार प्राणी असल्याने त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासाठी तसेच सोबतीसाठी करतात. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.

वसईत एका कुत्र्याने आपल्या जीवाची बाजी लावत सोसायटीच्या बागेत खेळणाऱ्या मुलांचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे.

सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळत असलेल्या मुलांचा पाय विजेच्या जिवंत तारेवर पडणार होता. इतक्यातच सनी या पाळीव कुत्र्याने त्यावर झेप घेत स्वतःचे प्राण दिले.

वसई पूर्वेकडील वीणा डायनासिटी या गृहनिर्माण सोसायटीत ही घटना घडली.

सनीच्या बलिदानामुळेच या 5 मुलांचा जीव वाचला आणि मोठी दुर्घटना टळली.सोसायटी कमिटीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *