अयोध्येतील राम मंदिराची सुनावणी 2 महिने लांबणीवर

अयोध्येतील राम जन्मभूमी जमीन वादाबाबतची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी 2 महिन्यांसाठी पुढे ढकलली गेली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. तसेच सुनावणीची तारीख लवकरचं निश्चित केली जाणार आहे.

अलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार होती.

मशीद हा इस्लामचा एकात्मिक भाग नसल्याचा निकाल कोर्टाने 1994 मध्ये दिला होता. त्यावर दाखल फेरविचार याचिकेवर निकाल देताना हा खटला 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यास न्यायालयानं नकार दिला होता.

माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पीठाने हा नागरी दावा पुराव्यांच्या आधारे निकाली काढता येईल. पूर्वीच्या निकालाशी त्याचा काही संबंध नाही असा निकाल २ विरुद्ध एक मताने दिला होता.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *