अमृतसर रेल्वेदुर्घटना प्रकरण: हायकोर्टाने फेटाळली चौकशीची मागणी

पंजाबमध्ये रेल्वेखाली चिरडून 61 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटक इथे घडली होती.

‘रावण दहन’ पाहण्यासाठी जमलेली गर्दी रेल्वे रुळावर थांबलेली असताना अनेक लोक धावत्या गाडीखाली चिरडले गेले होते.

याप्रकरणीबाबत एसआयटी किंवा सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.

पंजाब-हरयाणा हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पण रेल्वे ट्रॅकवर स्वत: उभ्या असलेल्या लोकांच्या मृत्युसाठी सरकार किंवा कार्यक्रमाचा अध्यक्ष कसा जबाबदार असू शकतो, असा सवाल करत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *