लाँच होण्यापूर्वीच लिक झाले Oppo A7चे फिचर्स

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपो (Oppo) त्यांचा मध्यम किमतीचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने या फोन लाँच करणार असल्याची घोषणा केली होती मात्र कधी करणार याची तारीख अजून जाहिर केली नाहीय. पण हा फोन लाॅंच होण्याआधीच या फोनची माहिती सगळीक़डे लिक झाले आहे. Oppo A7 या स्मार्टफोनला चीनच्या टेलीकॉम वेबसाइटवर पाहिलं गेलंय. इथे या फोनचे स्पेसिफीकेशन आणि किंमतबाबतची माहिती लिक झाली आहे.

चीनच्या टेलीकॉम वेबसाइटवरुन मिळालेल्या माहितीनूसार Oppo A7 हा स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये लाँच होऊ शकतो.

हे आहेत लिक झालेले या फोनचे फिचर्स – 

  • याची किंमत 1,599 युआन (21,000 रुपये) असण्याची शक्यता आहे.
  • त्याचबरोबर या फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात येणार आहे.
  • या फोनचा रंग सोनेरी आणि थोडा गुलाबी असा असणार आहे.
  • हा फोन 6.2 इंच आहे आणि त्याचा एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
  • ज्याची रेजॉल्यूशन 1520×720 पिक्सल असेल. त्याचबरोबर हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो.
  • या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर असू शकतो.
  • त्याचबरोबर 4230mAhची बॅटरी असू शकते आणि कॅमेरा 16 मेगापिक्सल फ्रंट आणि मागे डुअल कॅमेरा 13MP+2MP असण्याची शक्यता आहे.
  • तसेच डुअल सिम आणि कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE, वाय फाय, ब्लूटूथ, 2.0 चा मायक्रोयूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएमचा ऑडियो जैक असण्याची शक्यता आहे.

असे लिक झालेल्या माहितीमध्ये हे सांगण्य़ात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *