‘या’ कारणामुळे टी 20 संघातून धोनी आऊट

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणाऱ्या दुसऱ्या टी 20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. तर विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया अशा टी-20 मालिकेत धोनीला संधी का मिळाली नाही? याची चर्चा सुरु झाली. मात्र धोनीला संघात स्थान का मिळालं नाही याचे कारण बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे.

निवडकर्त्यांना दुसऱ्या विकेटकीपरचा शोध असल्याचे कारण एमएसके प्रसाद यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच या मालिकेत रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे. मात्र धोनीला मुख्य मालिकेतून वगळण्यात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याचा समावेश नाही यामुळे धोनीचे फॅन्स नाराज झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *