विंडिजविरुद्ध अखेरचा सामना, ‘हे’ आहेत भारतीय संघात

वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमराहला संघात स्थान देण्यात आले आहे. तर मोहम्मद शामीला संघातून वगळण्यात आले आहे

वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या 3 एकदिवसीय सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमराहला संघात स्थान देण्यात आले आहे तर मोहम्मद शामीला संघातून वगळण्यात आलं आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 5 वनडे सामन्यांची मालिका सुरू असून आतापर्यंत 2 सामने झाले आहेत. गुवाहटी येथे खेळलेला पहिला सामना भारताने 8 गडी राखून जिंकला.

तर विशाखापट्टणम येथील सामन्यात दोन्ही संघाची धावसंख्या समान असल्याने हा सामना टाय झाला. मालिकेतील तिसरा सामना 27 ऑक्टोबरला पुण्यात होणार आहे. 29 ला मुंबईत तर अखेरचा सामना थिरुवनंतपूरम येथे होणार आहे.

5 वनडे सामन्यांची मालिका संपल्यानंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

टी-20चा पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये, दुसरा सामना 6 नोव्हेंबरला लखनऊ आणि तिसरा व अखेरचा सामना चेन्नईत 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

अखेरच्या 3 वनडेसाठी भारतीय संघात असणार हे खेळाडू

 • विराट कोहली (कर्णधार)
 • रोहित शर्मा (उपकर्णधार)
 • शिखर धवन
 • अंबाती रायुडू
 • मनीष पांडे
 • महेंद्रसिंग धोनी
 • ऋषभ पंत
 • रवींद्र जाडेजा
 • युजवेंद्र चहल
 • कुलदीप यादव
 • खलील अहमद
 • भुवनेश्वर कुमार
 • केएल. राहुल
 • जसप्रित बुमराह
 • उमेश यादव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *