धोनीपाठोपाठ विराटचा नवा लूक व्हायरल….

भारतीय टीमचे खेळाडू नेहमीच आपला लूक बदलत असतात. कधी हेअरस्टाईल तर कधी दाढींची स्टाईल बदलतात
तसंच हे खेळाडू सीरिज किंवा मॅचच्या आधीही आपल्या लूकमध्ये बदल करतात.
वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे सीरिज सुरू होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीने फ्रेंच कट लूक ठेवला. धोनीचा हा दाढीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. धोनी पाठोपाठ आता भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही नवा लूक केला आहे.

प्रसिद्ध हेयरस्टायलिस्ट आलिम हकीमनं विराटला हा नवा लूक दिला आहे. आलिमनं विराटबरोबरचा नव्या लूकचा फोटो ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो एडिट करून हकीमनं विराटच्या चेहऱ्याच्याऐवजी मांजरीचा चेहरा लावला आहे. तसंच ओळखलंत का कोण आहे, असा प्रश्नही त्यानं विचारला.

 

View this post on Instagram

 

Guess who ???? ?

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim) on

तर ट्विटरवर किंग विराट कोहली विशाखापट्टणममध्ये नव्या हेअरकटसह. असं कॅप्शन आलिम हकीमनं विराटच्या या फोटोला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *