#Indvswin वनडेत विराटच्या 10 हजार धावा पूर्ण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावे एक नवा विक्रम स्थापित केला आहे.

वनडेमध्ये सर्वात कमी डावांत 10 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून विराटच्या नावाची नोंद झाली आहे. विराटने सचिन तेंडुलकरचा 17 वर्ष जुना जागतिक विक्रम मोडला आहे.

विराट कोहलीने वन डे करिअरमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बुधवारी वेस्टइंडिजच्या विरोधात विशाखापट्टनममध्ये दुसऱ्या वन डेत 81 धावा करताच त्याने हा विक्रम केला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने  259 डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

विराट कोहली 10 हजार धावा करणारा 5 वा भारतीय आणि जगातील 13वा फलंदाज ठरला आहे, विराटने सर्वात कमी म्हणजेच 205 इनिंगमध्ये हा विक्रम केला आहे. विराटने केवळ 205 डावांमध्ये 10 हजारी धावा पूर्ण केल्या. सचिनपेक्षा विराट 45 डाव कमी खेळला आहे. त्यामुळे सचिनचा विक्रम मोडण्यात विराटला यश मिळालं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *