पुण्यात शिवशाही बसला अपघात

अपघाताच्या सत्रात आता वाढ होत चालली आहे. पुण्यातल्या किणी टोल नाका येथे शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 19 प्रवासी जखमी असून बस चालकाचा मृत्यू झाला आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाका येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे. ही बस पुण्याहून कुडाळला जात असताना एका ओमनी गाडीला ओव्हरटेक करत असताना बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. यात बसचालकाचा मृत्यू झाला तर 19 जण गंभीर जखमी आहे. जखमी झालेले प्रवासी पुणे आणि कुडाळ येथील रहिवाशी आहेत.

मृत झालेल्या बस चालकाचे नाव सागर सुधाकर परब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *