पीक विम्याच्या पोचपावतीवर 32 जून 2017ची तारीख

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

पीकविम्यावरुन प्रशासन शेतकऱ्यांची थट्टा करतंय का असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकऱ्यांना अशी पोचपावती दिली; या पावतीवरची तारीख पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

 

जी तारीख कॅलेंडरमध्येही नाही ती तारीख बीड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पावतीवर टाकण्याची करामत केली. या पोचपावतीवर 32 जून 2017 ही तारीख टाकलेली आहे.

 

एकीकडे शेतकरी पीक विम्यासाठी रात्र रात्र रांगेत उभे राहत आहेत. पण परळी तालुक्यातल्या धर्मापुरीच्या जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांची ही अशी थट्टी केली आहे. पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना या बँकेनं चुकीच्या महिन्याचीच नाही तर अस्तित्वात नसलेली तारीख टाकून पोचपावती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *