मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोलीत छत कोसळलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोलीत छत कोसळल्याची घटना समोर आली. आमदार सतीश पाटील यांच्या रुममधील सीलिंग कोसळलं.

आमदार सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील रुम नंबर 125 मध्ये राहतात. अँटी चेंबरमधील पीओपीसहित छत कोसळलं. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

 

दक्षिण मुंबई परिसरात आमदारांचं हक्काचं निवासस्थान म्हणून मनोरा आमदार निवास ओळखलं जातं. सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचा दर्जा खराब असल्याचा अहवाल इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये साधारण वर्षभरापूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार ही इमारत धोकादायक असल्याचं पुढे आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *